महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विकी कौशलचा 'भूत' चित्रपटातील थरारक लुक, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Bhoot Part one the haunted ship

विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात झळकणार आहे. भानू प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

First look poster of Bhoot Part One, Vicky Kaushal starer First look poster of Bhoot Part One, विकी कौशलचा 'भूत' चित्रपटातील लुक, Vicky Kaushal news, Vicky Kaushal first poster of Bhoot, Bhoot Part one the haunted ship, भूत- द हॉन्टेड शिप
विकी कौशलचा 'भूत' चित्रपटातील थरारक लुक, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By

Published : Jan 30, 2020, 11:23 AM IST

मुंबई - 'मसान', 'राजी' आणि 'द सर्जिकल स्ट्राईक', यांसारख्या चित्रपटात विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. अल्पावधितच त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आता 'भूत- द हॉन्टेड शिप' या चित्रपटात तो थरारक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील त्याचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर देखील या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये विकी कौशलच्या पाठीवर भूत असल्याचे पाहायला मिळते. तर, दुसऱ्या एका पोस्टरध्ये भूतांच्या हातांमध्ये तो अडकलेला दिसतो. या पोस्टरवरून हा चित्रपट गुढ रहस्याने भरलेला असल्याचा अंदाज येतो. या पोस्टरनंतर आता चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा -फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत 'मैदान' चित्रपटातील अजय देवगनचा पहिला लुक

भानू प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच धर्मा प्रोडक्शनच्या सोशल मीडिया पेजवरही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओत 'द डार्क टाईम्स बिगिन नाऊ', अशा ओळी पाहायला मिळाल्या होत्या. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -आनंद एल. राय यांच्या चित्रपटात अक्षय, सारासह धनुषची वर्णी, फर्स्ट लुक प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details