ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा आज तिसरा स्मृतिदिन आहे. कर्करोगाच्या आजाराने त्यांचे ७० व्या वर्षी निधन झाले होते. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी 'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्य काही आठवणी जागवूयात.
रुपेरी पडदा गाजवणारे भाटकर
3 ऑक्टोबर 1949 साली जन्मलेल्या भाटकर यांनी 1977 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 'चांदोबा चांदोबा भागलास का' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' अशा असंख्य चित्रपटात त्यांनी काम केलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. या चित्रपटात रमेश भाटकरांनी मुख्य भूमिका साकारली. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती.
रंगभूमीवरील रमेश भाटकर
रंगभूमीवर त्यांची अनेक नाटके गाजली. 'अखेरीस तू येशीलच', 'केव्हातरी पहाटे', 'मुक्ता' ही त्यांची विशेष गाजलेली नाटकं होती. १९७५ साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात भाटकरांनी 'लाल्या'ची भूमिका एकदम कडक केली होती.
दूरदर्शनवर रमेश भाटकरांचा दरारा