मुंबई -अभिनेता शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वीर-जारा' चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राणी मुखर्जीने या चित्रपटाच्या सेटवरील काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. त्यांच्यासोबतच्याही काही आठवणींना राणीने उजाळा दिला आहे.
'यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. ते नेहमी कॅमेराच्या मागे राहत असत. आमच्या कामाकडे त्याचं काटेकोर लक्ष असायचं. कलाकारांकडुन व्यवस्थित काम करून घेणं त्यांना चांगल्याप्रकारे माहिती होतं', असे राणीने म्हटलं आहे.
हेही वाचा -आयुष्मान खुरानाच्या 'बाला'ची घोडदौड, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई