मुंबई- पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. अशात भारताचे विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. देशभरातून अभिनंदन यांना सुखरूप भारतात परत आणण्याची मागणी होत असतानाच त्यांच्याबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकवर बॉलिवूड कलाकार संतापले आहेत.
अभी अभी तो आये हो! अभिनंदन यांच्याबद्दलच्या ट्विटमुळे वीना मलिकवर बॉलिवूडकर संतापले - officer
वीना मलिकने भारतात मनोरंजन श्रेत्रात काम केले आहे. इतकचं नव्हे तर बिग बॉस या रिअॅलिटी शोसाठी ती अनेक दिवस भारतातच होती
वीना मलिकने भारतात मनोरंजन श्रेत्रात काम केले आहे. इतकचं नव्हे तर बिग बॉस या रिअॅलिटी शोसाठी ती अनेक दिवस भारतातच होती, असे असतानाही तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अभिनंदन यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला तिने कॅप्शनही दिले आहे. अभी अभी तो आये हो, अच्छी मेहमान नवाझी होगी आपकी! असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
तिच्या या ट्विटला उत्तर देत, वीना जी, तुमची आणि तुमच्या खालच्या दर्जाच्या मानसिकतेची लाज वाटते. आमचे ऑफिसर हे अतिशय शूर हिरो आहेत. तुमच्या आर्मीतील मेजरने देखील अभिनंदन यांना प्रश्न विचारताना सभ्यता दाखवली आणि अनेक पाकिस्तानीदेखील शांततेची मागणी करत असल्याचं म्हणत स्वराने तिला सडेतोड उत्तर दिले आहे. यासोबतच भाभीजी घर पे हैं मालिकेतील सौम्या टंडननेदेखील हिच्यासारखी व्यक्ती असं काही ट्विट करेल, असा विचारही कधी केला नसल्याचं म्हटलं आहे.