महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कंगना VS वरुण धवन : 'पंगा' आणि 'स्ट्रीट डान्सर'मध्ये कोण मारणार बाजी? - street dancer release date

रेमो डिसुजा यांनी स्ट्रीट डान्सरचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, प्रभू देवा, नोरा फतेही यांच्यासोबत इतर बऱ्याच कलाकारांच्या भूमिका आहेत. तर, अश्विनी अय्यर तिवारींनी कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Varun reacts on Street Dancer 3D release clash with Kangana's Panga
कंगना VS वरुण धवन : 'पंगा' आणि 'स्ट्रीट डान्सर'मध्ये कोण मारणार बाजी?

By

Published : Dec 28, 2019, 2:31 PM IST

मुंबई -नववर्षाची सुरुवात होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. यंदाच्या वर्षाप्रमाणेच नववर्षाची सुरुवातही बिग बजेट चित्रपटांनी होणार आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रनौतचा 'पंगा' आणि अभिनेता वरुण धवनचा मल्टीस्टार 'स्ट्रीट डान्सर' हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. या दोन्हीही चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

रेमो डिसुजा यांनी स्ट्रीट डान्सरचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, प्रभू देवा, नोरा फतेही यांच्यासोबत इतर बऱ्याच कलाकारांच्या भूमिका आहेत. तर, अश्विनी अय्यर तिवारींनी कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट एका कबड्डी खेळाडूवर आधारित आहे. कंगना यामध्ये मध्यमवर्गीय महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या या दोन्ही चित्रपटाचे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

हेही वाचा -'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी'ची खास झलक, प्रदर्शनाची तारीख जाहीर

बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या टक्कर बद्दल वरुण धवनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी बऱ्याच वर्षांपासून कंगनाचे काम पाहत आहे. तिच्या कामाचा मी आदर करतो. बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची टक्कर होणे, हे आता काही विशेष नाही. प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट आवडले, तर दोन्हीही चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळेल', असे तो चित्रपटाच्या प्रमोशनवेळी म्हणाला.

वरुण धवन

२४ जानेवारीला हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता कंगनाच्या 'पंगा' आणि वरुण धवनच्या 'स्ट्रीट डान्सर'पैकी कोणत्या चित्रपटाला तिकिटबारीवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -'दबंग ३' VS 'गुड न्यूज', अक्षय कुमारच्या चित्रपटांबाबत काय म्हणाला सलमान खान

ABOUT THE AUTHOR

...view details