महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरुण धवनचा 'भेडिया' पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार रिलीज, पोस्टर जारी - Horror-comedy movie Bhedia

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'भेडिया' ( Film Bhediya) हा चित्रपट पुढील वर्षी २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते दिनेश विजन (Dinsh Vijan) यांनी गुरुवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली.

वरुण धवनचा 'भेडिया'
वरुण धवनचा 'भेडिया'

By

Published : Nov 25, 2021, 7:05 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'भेडिया' ( Film Bhediya) हा चित्रपट पुढील वर्षी २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते दिनेश विजन (Dinsh Vijan) यांनी गुरुवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली.

भेडिया हा हॉरर-कॉमेडी चित्रपट अमर कौशिक (amar kaushik) दिग्दर्शित करत आहे, त्याने बाला (film Bala) चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची पटकथा निरेन भट्ट यांनी लिहिली आहे. भट्ट वेब सीरिज असुर (Web series asur) आणि प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा यासाठी ओळखले जातात. भेडियाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची नवीन रिलीज डेट आणि फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला.

पुढच्या वर्षी या तारखेला भेटूया, असे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये लिहिले आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत क्रिती सेननही (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहे. भेडिया हा चित्रपट 25 नोव्हेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अरुणाचल प्रदेशातील झिरो शहरात या वर्षी मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. स्त्री आणि रुही नंतर निर्माता दिनेश विजानचा हॉरर-कॉमेडी श्रेणीतील तिसरा चित्रपट. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्ससाठी हॉलिवूड स्टुडिओ मिस्टर एक्सची सेवा घेण्यात आली आहे.

विजन म्हणाला, जेव्हापासून आम्ही भेडियाच्या स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून आम्हाला माहित होते की आमच्या चित्रपटाला मिस्टर एक्स स्टुडिओच्या तज्ञांची गरज आहे. निर्मात्यांनी याआधी चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. ज्यामध्ये एक माणूस लांडगा बनताना दाखवण्यात आला होता.

हेही वाचा - स्वरा भास्कर म्हणते, ''आई व्हायचंय मला''

ABOUT THE AUTHOR

...view details