महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कुली नंबर वन'चे शूटिंग पूर्ण, वरुण धवनने 'असं' केलं सेलिब्रेशन - Varun Dhawan and sara ali khan

वरुण धवनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली.

Coolie No one film shooting wrap, Varun Dhawan wrap up Coolie No one shooting, Varun Dhawan share photo, Varun Dhawan Latest news, Varun Dhawan upcoming film, Varun Dhawan and sara ali khan, news about Varun Dhawan
'कुली नंबर वन'चे शूटिंग पूर्ण, वरुण धवनने 'असं' केलं सेलिब्रेशन

By

Published : Feb 21, 2020, 5:01 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांची मुख्य जोडी असलेला 'कुली नंबर वन' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मागच्या वर्षीपासून या चित्रपटाचे विविध ठिकाणी शूटिंग सुरू होते. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 'कुली नंबर वन' या चित्रपटाचाच रिमेक आहे.

वरुण धवनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. 'हा चित्रपट माझ्या करिअरमधला आत्तापर्यंतचा सर्वाधिक मजेदार चित्रपट आहे. या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी फार आनंदी आहे', असे वरुणने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा -शिल्पा शेट्टीच्या घरी ७ वर्षानंतर पुन्हा पाळणा हलला, गोड परीचे आगमन

मध्यंतरी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन सेटवर जखमी झाला होता. यामध्ये बरेचसे स्टंट त्याने स्वत:च केले आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाऊ शकतो. वरुण आणि सारा यांच्याशिवाय या चित्रपटात अभिनेते परेश रावल, राजपाल यादव, रजत रवैल, शिखा तलसानिया, जावेद जाफरी आणि जॉनी लिवर यांच्याही महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

१९९५ साली 'कुली नंबर वन' चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची जोडी झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण आणि साराची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहेत. १ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -आयुष्यमान आणि विकी कौशलने आपल्या सिनेमांच्या रिलीजपूर्वी केला 'ब्रोमान्स'

अलिकडेच वरुण धवनने स्ट्रीट डान्सर थ्रीडी मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तर, सारा अली खान कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल २' मध्ये दिसली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details