महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरूण धवनच्या 'स्ट्रिट डान्सर'ची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - remo

हा चित्रपट 'एबीसीडी' चित्रपटाचा तिसरा भाग असल्याने चाहत्यामध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय.

वरूण धवनच्या 'स्ट्रिट डान्सर'ची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By

Published : May 27, 2019, 3:14 PM IST

मुंबई - 'कलंक' चित्रपटानंतर वरूण धवन आता 'स्ट्रिट डान्सर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. तसेच चित्रपटाचं नवं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

वरूण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही, अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. रेमो डिसुजा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 'एबीसीडी' चित्रपटाचा तिसरा भाग असल्याने चाहत्यामध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय.

स्ट्रीट डान्सरचे नवे पोस्टर

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी देखील या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये वरूणच्या हातात तिरंगा पाहायला मिळतो. हा चित्रपट 'थ्रीडी' स्वरूपातही पाहता येईल. या चित्रपटाचे पहिले शुटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. आता दुबई येथे या चित्रपटाचे दुसरे शेड्यूल पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी चित्रपटाची टीम दुबईला रवाना झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details