मुंबई - अभिनेता वरूण धवन सध्या 'कुली नंबर १' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 'कुली नंबर १' या चित्रपटाचाच हा रिमेक आहे. अभिनेत्री सारा अली खान यामध्ये वरूणसोबत झळकणार आहे. या चित्रपटात वरूणचे काही स्टंटही पाहायला मिळणार आहेत. मात्र, एका स्टंटची शूटिंग करताना वरूणसोबत एक अपघात घडला.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरूणला लटकलेल्या कारमध्ये स्टंट करण्याचे शूटिंग करायचे होते. तांत्रिकदृष्ट्या सर्व सेटची तपासणी पूर्ण झाली होती. तरीही ऐनवेळी वरूणला ज्या कारमध्ये स्टंट करायचा होता, त्यावेळी तो कारमध्ये होता. आणि कारचा दरवाजा उघडत नव्हता. वरूण कारमध्ये असल्यामुळे सेटवर चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. शेवटी टीमने शर्थीचे प्रयत्न करून वरूणला कारमधून बाहेर काढले. जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
हेही वाचा -'पानिपत'च्या लूकवरून ट्रोल झालेल्या अर्जुन कपूरने अखेर सोडले मौन