मुंबई -अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या आगामी 'कुली नंबर १' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यासाठी सारा आणि वरुण दोघेही बँकॉकला रवानाही झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचं टीजर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. मात्र, वरुण धवनचा मुख्य लूक उद्या म्हणजेच सोमवारी १२ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, वसू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.