मुंबई - रेमो डिसुजा यांचं दिग्दर्शन असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा यांच्यावर चित्रीत झालेलं 'मुकाबला' हे गाणंदेखील सोशल मीडियावर हिट झालं आहे. आता नोरा फतेही आणि वरुणची हॉट केमेस्ट्री असलेलं 'गरमी' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
बादशाहने हे गाणं लिहिलं आहे. त्यानेच हे गाणं कपोजही केलं आहे. नेहा कक्कर आणि बादशाहने हे गाणं गायलं आहे. तर, रेमोने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' हा 'एबीसीडी' चित्रपटाचाच तिसरा भाग आहे. यामध्येदेखील धमाल डान्सची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.