महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरुण-नताशा याचवर्षी अडकणार लग्नबंधनात; डेस्टिनेशन वेडिंगचेही प्लॅनिंग? - कुली नंबर वन

वरुण आणि नताशा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे ते यावर्षी लग्नगाठ बांधणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांचा साखरपुडादेखील आटोपल्याच्या चर्चा सुरू होत्या.

वरुण - नताशा याचवर्षी अडकणार लग्नबंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचेही प्लॅनिंग?

By

Published : Aug 21, 2019, 2:22 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये काही काळापासून लग्नाचा सीजन सरू आहे. अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली आहे. आता या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. अभिनेता वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल दोघेही लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या लग्न समारंभासाठी ते डेस्टिनेशन वेडिंगचेही प्लॅनिंग करत असल्याची माहिती मिळत आहे.

वरुण आणि नताशा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे ते यावर्षी लग्नगाठ बांधणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी त्यांचा साखरपुडादेखील आटोपल्याचे वृत्त दिले आहे. मात्र, याबद्दल अद्याप वरुण किंवा नताशाच्या कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वरुण - नताशा

आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी वरुण आणि नताशाचे प्लॅनिंग सुरू आहे. त्यांच्या लग्नात बॉलिवूडच्या काही निवडक कलाकारांनाच आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वरुण - नताशा

सध्या वरुण त्याच्या आगामी 'कुली नंबर वन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details