मुंबई -अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या 'स्ट्रीट डान्सर' आणि 'कुली नंबर वन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नववर्षात त्याचे हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय आगामी 'मिस्टर लेले' या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूडच्या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'मिस्टर लेले' या चित्रपटात वरुण धवनसोबत कियारा आडवाणी भूमिका साकारणार होती. मात्र, कियाराने तारखांचे कारण देऊन या चित्रपटातून माघार घेतली आहे. आता तिच्या जागी जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील यामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा -महिलांच्या जीवनातील संघर्षावर भाष्य करणारे नाटक 'बाई वजा आई'