महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘हास्यजत्रा’ कलाकार वनिता खरात अन् ओंकार राऊत आता दिसणार 'लकडाऊन' या चित्रपटात - लकडाऊन बी पॉझिटिव्ह

अभिनयाचा पाया एकांकिकांमधून घट्ट होत असतो, असे म्हटले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील नव्वद एक टक्के कलाकार एकांकिका करून पुढे आलेले आहेत. नाटक, सिनेमा किंवा मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये कार्यरत असलेले अनेक कलाकार घडविण्याचे काम एकांकिका या माध्यमाने केले आहे. उत्तम आणि होतकरू कलाकार येथूनच पुढे आले आहेत. वनिता खरात ( Vanita Kharat ) आणि ओंकार राऊत ( Onkar Raut ) ही दोन नाव प्रामुख्याने या संदर्भात घेतली जाऊ जातात.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Feb 16, 2022, 8:52 PM IST

मुंबई- अभिनयाचा पाया एकांकिकांमधून घट्ट होत असतो, असे म्हटले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील नव्वद एक टक्के कलाकार एकांकिका करून पुढे आलेले आहेत. नाटक, सिनेमा किंवा मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये कार्यरत असलेले अनेक कलाकार घडविण्याचे काम एकांकिका या माध्यमाने केले आहे. उत्तम आणि होतकरू कलाकार येथूनच पुढे आले आहेत. वनिता खरात ( Vanita Kharat ) आणि ओंकार राऊत ( Onkar Raut ) ही दोन नाव प्रामुख्याने या संदर्भात घेतली जाऊ जातात.

हतबल न होता परिस्थितीशी झगडत हे एकांकिका कलाकार मनोरंजन सृष्टीत पुन्हा नव्याने उभे राहत आहेत. कलाकृती कोणतीही असो वा कोणतंही माध्यम, एकांकिका करणाऱ्या या कलाकारांनी नेहमीच सगळ्यांना भुरळ पाडली. एकांकिका विश्वात आपली छाप पडल्यानंतर वनिता खरात आणि ओंकार राऊत हे विनोदी कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दिसत आहेत. आता पुढचा टप्पा गाठत हे दोघेही 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटात दिसून येणार आहेत.

संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘लकडाऊन’ या चित्रपटात वनिता खरात आणि ओंकार राऊत महत्वपूर्ण भूमिकांत असून या दोघांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्यासोबत हे दोघे तरुण कलाकार झळकणार आहेत. ‘लकडाऊन’ हा कौटुंबिक-विनोदी आणि चित्रपट असून ओंकार यात अंकुश चौधरी याच्या लहान भावाची भूमिका साकारत आहे. तर वनिताची भूमिका काय आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.

वनिता आणि ओंकार हे दोघेही एकांकिका माध्यमाशी संलग्न असून या चित्रपटाच्या निमित्ताने दोन एकांकिका रंगकर्मींना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने वनिता आणि ओंकार दोघेही तब्बल महिनाभर जुन्नर येथे होते. पहिल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता उघडतातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळत या चित्रपटाच चित्रीकरण पार पडले. चित्रीकरणाच्यावेळी शुभा खोटे यांचा एक भाग चित्रित केल्यानंतर ज्यावेळी त्या एका खोली बाहेर पडत होत्या त्यावेळी त्या धडपडल्या आणि त्या वेळी तिथे असलेला ओंकार राऊत यांनी त्यांना आधार दिला, त्याच मनगट घट्ट धरत स्वतःला सावरत शुभा खोटे ओंकार राऊतला म्हणाल्या, "शेवटचा असा हात मी देवानंद यांचा धरला होता", अशी एक आठवण ओंकारला या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्यभर सोबत राहील.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात अंकुश, प्राजक्ता, वनिता आणि ओंकार सोबत तब्बल 12 नामवंत कलाकार असणार आहेत. चित्रपटाच्या कार्यकारी निर्माता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचे साउंड रेकॉर्डिंग अभिजित देव यांनी केले आहे. शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश-विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. ‘लकडाऊन’ हा चित्रपट 25 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -बप्पीदांनी सांगितला होता किशोर कुमारच्या शेवटच्या रेकॉर्डिंगचा आनंददायी किस्सा

ABOUT THE AUTHOR

...view details