पुणे- 'गो करोना, करोना गो', या दोन शब्दांमुळे रामदास आठवले हे पुन्हा चर्चेचा विषय ठरले. मात्र त्यामुळे का होईना करोनामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांना हसवले. दरम्यान, या शब्दाला धरून गायक उत्कर्ष शिंदे यांनी 'गो-करोना, करोना गो', हे गीत गायले आहे.
तेजस चव्हाण यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. तसेच त्यांनीच या गाण्याचे बोल लिहले आहेत. कोरोनामुळे नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या गाण्यामधून नागरिकांचे हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसचे, कोरोनापासून बचावाकरता कशी काळजी घ्यायची, हे देखील हसत खेळत सांगण्यात आले आहे.
'गो कोरोना गो...', जीवघेण्या विषाणूवर उत्कर्ष शिंदेचं गाणं हेही वाचा -बॉक्स ऑफिसला कोरोनाचा फटका, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह राहणार बंद
रामदास आठवले यांच्या 'गो कोरोना' या कवितेवरुन तेजस चव्हाण यांनी कोरोनावर आधारित गाणं साकारले आहे. अत्यंत सोप्या भाषेचा वापर करुन हे गाणे तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे ते या मधून जनजागृती करण्यात आली आहे. स्वतः उत्कर्ष शिंदे यांनी रामदास आठवले यांचा आवाज काढत गो-करोना गीत गायले आहे. उत्कर्ष हे डॉक्टर असून त्यांनी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे गीत गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे गीत ऐकून तरी नागरिक स्वतः ची काळजी घेतील अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट टळली, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन