मुंबई - सध्या देशभरात निवडणूकांचे घमासान सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीकासत्रांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बॉलिवूडचेही बरेचसे कलाकार राजकीय क्षेत्रात उतरले आहेत. यामध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बरीच चर्चेत आहे. उर्मिला मातोंडकरने अलिकडेच नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींच्या 'रडार' विधानावर उर्मिला मातोंडकरने लगावला टोला, म्हणाली....
नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान 'रडार' संबधी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आले आहे. ते म्हणाले होते, बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राईकदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या ढगाळ वातावरणात पाकिस्तानी रडारपासून आपण वाचू शकलो'.

पंतप्रधान मोदींच्या याच वक्तव्यावर उर्मिलाने निशाणा साधला आहे. तिने तिच्या पाळीव कुत्र्यासोबत एक फोटो शेअर करून त्यावर एक कॅप्शन दिले आहे. 'देवाचे आभार आहेत, की आज वातावरण चांगले आहे, ढगाळ वातावरण नाही. यामुळे माझा डॉगी रोमियोच्या कानापर्यंतही रडारचे सिग्नल पोहचत आहेत'. या कॅप्शनमध्ये तिने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, तिचा हा टोला मोदींनाच आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.