महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

उर्मिलाचा प्रचार शिगेला, रोड शोद्वारे केले शक्तिप्रदर्शन - Congress

उर्मिला मातोंडकरांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज मुंबईत रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मालाड पश्चिमेकडील हनुमान मंदिर येथे उर्मिला यांनी दर्शन घेऊन रोड शोला सुरुवात केली.

उर्मिलाचा प्रचार शिगेला

By

Published : Apr 27, 2019, 12:13 AM IST


मुंबई - चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला अवघे 72 तास राहिले असताना, सर्वच राजकीय पक्षाकडून जास्तीतजास्त नागरिकांना भेटण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आज संध्याकाळी काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी रोड शोच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला.

उर्मिलाचा प्रचार शिगेला

मालाड पश्चिमेकडील हनुमान मंदिर येथे उर्मिला यांनी दर्शन घेऊन रोड शोला सुरुवात केली. यावेळी 100 वर दुचाकीस्वार या रॅलीत विना हेलमेट सहभागी झाले होते.

मालाड हनुमान मंदिर एसव्ही रोड ते दहिसर एसव्ही रोडपर्यंत हा रोड शो करून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटीलदेखील या रॅलीत सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details