मुंबई -फुटबॉल खेळाचा रंजक सूवर्णकाळ उलगडणारा 'मैदान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगन यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगन फुटबॉल परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचाही पहिला लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
'मैदान' चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगन पहिल्यांदाच 'बधाई हो' चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रविंद्रनाथ शर्मा यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामनी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, गजराज राव यांचीही यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -अजय देवगणच्या आगामी 'मैदान' चित्रपटाची घोषणा, आता प्रतीक्षा टीझरची