मुंबई -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते बरेच अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. तसंच, त्यांच्या आयुष्यातील काही खास घडामोडींनाही ते उजाळा देतात. १७ ऑक्टोंबरला 'करवा चौथ'च्या निमित्ताने त्यांनी जया बच्चन यांचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. तसंच सर्व महिलांना त्यांनी 'करवा चौथ'च्या शुभेच्छाही दिल्या.
जया बच्चन यांचा हा फोटो खरंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा आहे. मात्र, बिग बींनी मोठ्या शिताफिने हा फोटो क्रॉप करून फक्त जया बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. जया यांच्या तरुणपणातील सौंदर्याची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते. आजही त्या पुर्वीप्रमाणेच सुंदर दिसतात.
हेही वाचा -सोनम कपूरच्या घरी 'करवा चौथ' साजरा करण्यासाठी अभिनेत्रींची वर्दळ