नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लता मंगेशकर यांच्या चित्र संग्रहाचे अनावरण केले. ख्यातनाम दिवंगत फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी कॅमेऱ्यात कैद केलेल्या लतादिदींच्या सर्वोत्तम छबी या संग्रहात आहेत. लता मंगेशकरांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या संग्रहाचे अनावरण करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांच्या गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या अप्रकाशित छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन - compilation of portraits of legendary singer Lata Mangeshkar
गृहमंत्री अमित शाह यांनी लता मंगेशकर यांच्या चित्र संग्रहाचे अनावरण केले. या अनोख्या चित्रसंग्रहाच्या अनावरणाच्या प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार व लतादिदींच्या बहिण उषा मंगेशकर उपस्थित होत्या.

या अनोख्या चित्रसंग्रहाच्या अनावरणाच्या प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार व लतादिदींच्या बहिण उषा मंगेशकर उपस्थित होत्या. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटरवर या प्रसंगाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''स्पंदन आर्ट तर्फे व्हँल्युएबल ग्रुपच्या सहकार्याने प्रकाशित लता मंगेशकर यांच्या गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या अप्रकाशित छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन दीदींच्या 90व्या वाढदिवसाच्या औचित्याने आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते उषाताईंच्या उपस्थितीत दिल्लीत केले.''
गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या अप्रकाशित छायाचित्र पुस्तकाच्या रुपात उपलब्ध झाल्यामुळे लतादिदींच्या चाहत्यांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.