पणजी -पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मधील ' इंडियन पॅनोरमा' विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाचा समावेश न केल्यामुळे गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
इंडियन पॅनोरमात गोमंतकीय चित्रपटाचा समावेश नसल्याने दिगंबर कामत यांनी व्यक्त केला संताप
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मधील ' इंडियन पॅनोरमा' विभागात एकाही गोमंतकीय चित्रपटाचा समावेश न केल्यामुळे गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दिगंबर कामत
कामत यांनी आज या संदर्भात ट्विट करून नापसंती व्यक्त करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालावे. तसेच इंडियन पॅनोरमामध्ये एकातरी गोमंतकिय चित्रपटाचा समावेश करावा, अशी मागणी करून गोव्यातील चित्रपट निर्मात्यांवरील अन्याय दूर न झाल्यास इफ्फी काळात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावर्षी इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने इफ्फीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.