महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

उमराव जानमधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड...

१९७४ साली आलेल्या गर्म हवा या चित्रपटात शौकत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर उमराव जान, बाझार, सलाम बॉम्बे या दर्जेदार सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले. २००२ साली आलेला साथिया हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 'कैफी अँड मी' या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले. हे चरित्र २००२ ला प्रसिद्ध झाले.

By

Published : Nov 23, 2019, 4:09 AM IST

Updated : Nov 23, 2019, 7:22 AM IST

शौकत कैफी

मुंबई - उमराव जान, बाझार अशा गाजलेल्या चित्रपटात अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या नामवंत अभिनेत्री शौकत कैफी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. दिग्गज शायर, गीतकार कैफी आझमी हे त्यांचे पती होते. तर अभिनेत्री शबाना आझमी या त्यांच्या कन्या आहेत.

अनेक दिवसांपासून शौकत कैफी आजारी होत्या. शबाना आझमी यांच्या जुहू येथील निवासस्थानी त्या वास्तव्याला होत्या. आपला शेवटचा श्वास त्यांनी शबाना यांच्याच कुशीत घेतल्याचे सांगितले जाते. अभिनयासहीत त्या एक लेखक म्हणून सुद्धा ओळखल्या जात असत.

शौकत आणि कैफी आझमी

शौकत आणि कैफी आझमी हे दोघेही डाव्या चळवळीशी जोडले गेले होते. इंडियन पिपल्स थेटर असोसिएशन (इप्टा) ही नाट्यसंस्था आणि प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन (पिडब्ल्यूए) या लेखक संघटनेत दोघेही सक्रिय होते. यासोबतच दोघांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाची कामगिरी केली.

१९७४ साली आलेल्या गर्म हवा या चित्रपटात शौकत यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर उमराव जान, बाझार, सलाम बॉम्बे या दर्जेदार सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले. २००२ साली आलेला साथिया हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 'कैफी अँड मी' या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले. हे चरित्र २००२ ला प्रसिद्ध झाले.

कैफी आझमी, शबाना आणि शौकत कैफी

शौकत यांची कन्या शबाना आझमी यादेखील चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. तसेच, त्यांना बाबा आझमी नावाचे पुत्र आहेत. आज (शनिवार) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

Last Updated : Nov 23, 2019, 7:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details