महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अर्चना पुरन सिंगसाठी रोमॅन्टिक गाणं गात होते उदित नारायण, पत्नी आल्यानंतर उडाली तारांबळ - udit narayan news in kapil sharma show

उदित नारायण हे कार्यक्रमाची परिक्षक अर्चना पुरन सिंग यांच्यासाठी रोमॅन्टिक गाणं गात होते. तेव्हा अचानक त्यांच्या पत्नीनेही शोमध्ये हजेरी लावली. तेव्हा त्यांची कशी तारांबळ उडाली, याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

अर्चना पुरन सिंगसाठी रोमॅन्टिक गाणं गात होते उदित नारायण, पत्नी आल्यानंतर उडाली तारांबळ

By

Published : Oct 12, 2019, 10:33 AM IST


मुंबई -कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा' हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो मानला जातो. या कार्यक्रमात दर आठवड्यात कोणत्या ना कोणत्या सेलेब्रिटींची विशेष उपस्थिती असते. त्यांच्यासोबत कपिलचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. यावेळी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांनीदेखील या कार्यक्रमात हजेरी लावली.

यावेळी उदित नारायण हे कार्यक्रमाची परिक्षक अर्चना पुरन सिंग यांच्यासाठी रोमॅन्टिक गाणं गात होते. तेव्हा अचानक त्यांच्या पत्नीनेही शोमध्ये हजेरी लावली. तेव्हा त्यांची कशी तारांबळ उडाली, याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा -सलमान खानच्या 'या' सुपरहिट गाण्यावर मेंढपाळाचा व्हिडिओ व्हायरल

सोनी टिव्हीच्या ऑफिशिअल पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये उदित नारायण हे अर्चना यांच्यासाठी 'मेहंदी लगाके रखना' हे गाणं गात होते. तेव्हा अचानक त्यांची पत्नी दीपा यांनीही हजेरी लावली. त्यांना पाहताच उदित यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य नारायण यानेही या कार्यक्रमात हजेरी लावली.

हेही वाचा -'द स्काय ईज पिंक': 'देसी गर्ल'चं दमदार कमबॅक, चित्रपटाच्या कमाईची गती मात्र संथ

लवकरच तो 'इंडियन ऑयडॉल' या सिंगिग रिअ‌ॅलिटी शोच्या सुत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याच कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी त्यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details