बंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचार करणऱ्या डॉक्टरांच्या टीमला यश मिळू शकले नाही आणि त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे. ही बातमी मिळताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली आहे. दरम्यान, त्याचा निधनानंतर एका चाहत्याने आत्महत्या केली असून दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
पुनीत राजकुमारच्या मृत्यूचा चाहत्यांना जोरदार धक्का, दोघांचा मृत्यू, दोन गंभीर - kannad superstar
कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनुर या तालुक्यातील मरूर या गावातील ३० वर्षीय मुनिअप्पा राजकुमारचा प्रचंड चाहता होता. त्याने राजकुमारच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर बघितली. त्याला लगेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्याचा मृत्यू झाला. मुनियप्पाच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. आधी तो बंगळुरुत नोकरी करायचा. पण लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर तो मुळगावी परतला होता. त्याने राजकुमारचा एकही चित्रपट चुकवला नव्हता.

बेळगावी जिल्ह्यातील अथणी येथील तरुण राहुल गाडीवड्डारा याने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला राजकुमार याच्या निधनाचा प्रचंड धक्का बसला होता. त्याने राजकुमारच्या फोटोला हार घातला आणि गळफास घेतला. उडुपी जिल्ह्यातील साळीग्राम गावातील ३५ वर्षीय आटोचालक सतीश याने बातमी समजताच आपला हात रिक्षावर जोरात आपटला. त्याला मोठी जखम झाली. त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याच जिल्ह्यातील शिंदोली गावात परशुराम देमन्ननावर हे राजकुमारचे कट्टर चाहते होते. निधनाची बातमी समजली तेव्हापासून ते सतत रडत होते. या दरम्यान त्यांना हृदयविचाराचा झटका आला. त्यांचीही प्रकृती गंभीर आहे.