महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'साहो' म्हणजे प्रभासच्या करिअरचा मास्टरपीस, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस - महेश मांजरेकर

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्यांनी या चित्रपटाला प्रभासच्या करिअरमधला मास्टरपीस म्हटले आहे. यावरुन 'साहो'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

'साहो' म्हणजे प्रभासच्या करिअरचा मास्टरपीस, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

By

Published : Aug 30, 2019, 10:32 AM IST

मुंबई - अ‌ॅक्शन, ड्रामा, रोमान्स, थ्रिल आणि सस्पेंसने भरलेला प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीचा 'साहो' अखेर आज (३० ऑगस्ट) प्रदर्शित झाला आहे. 'बाहुबली २' नंतर प्रभासला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर झाले होते. म्हणूनच पहिल्याच दिवशी 'साहो' पाहण्यासाठी चाहत्यांच्या सिनेमागृहात अक्षरश: उड्या पडल्या आहेत. तसेच, ट्विटरवरही चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

'साहो'च्या अ‌ॅक्शन सिन्सपासून ते व्हिएफक्स पर्यंत सर्वच गोष्टींची छाप चाहत्यांवर पडल्याचे पाहायला मिळतेय. कोणाला चित्रपटाच्या भव्यदिव्य सेट्सने प्रभावित केलं आहे. तर, कोणाला प्रभासच्या अभिनयाने. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्यांनी या चित्रपटाला प्रभासच्या करिअरमधला मास्टरपीस म्हटले आहे. यावरुन 'साहो'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिग्दर्शक सूजीत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं बजेट ३५० कोटी इतके आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून निर्मात्यांसह चाहत्यांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत.

ट्विटवरही चाहत्यांनी कोणत्याही नकारात्मक टीकांकडे लक्ष न देता चित्रपट पाहावा, असे आवाहन केले आहे.

बऱ्याच जणांनी चित्रटातील सर्वच कलाकारांचा अभिनय दमदार असल्याचे म्हटले आहे. तर, प्रभास हा तेलुगू सिनेसृष्टीतील टॉप अभिनेता असल्याचेही म्हटले आहे.

एकीकडे UAE च्या चित्रपट समीक्षकांनी 'साहो' मधील अॅक्शन सिन्स हे लांबलचक असल्याचे म्हटले आहेत. तर, प्रभासची हिंदी डबिंगही फार प्रभावशाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, ट्विटरवरील चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन करेल, असा अंदाज लावला जात आहे.

या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर आणि नील नितीन मुकेश यांच्याही भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details