मुंबई -जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कलाविश्वातील कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील एका ट्विटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
५ जानेवारीला जेएनयूच्या विद्यापीठ परिसरात काही गुंडानी आपले चेहरे झाकून अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. यामध्ये बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत ट्विंकलने एक फोटो शेअर करून म्हटले आहे, की 'भारत असा देश बनत आहे जिथे विद्यार्थ्यांपेक्षा गायी सुरक्षीत आहे. हा असा देश आहे ज्याने भीतीमध्ये जगण्यासाठी नकार दिला आहे. तुम्ही हिंसेच्या माध्यमातून लोकांवर दबाव आणू शकत नाही. यामुळे आणखी विरोध होईल. आदोलनं होतील. बरेच लोक रस्त्यावर उतरतील'.