मुंबई -कांद्यांचे वाढते भाव पाहून सोशल मीडियावर बरेच मिम्स व्हायरल झाले होते. अशातच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने आपली पत्नी ट्विंकलला कांद्याचे झुमके भेट म्हणून दिले होते. हे कानातले आपल्यासाठी अमुल्य असल्याचे म्हणत ट्विंकलने याचा फोटो सोशल मीडियावर शेअरही केला होता. आता तिने चक्क हे झुमके कानात घालून त्यासोबत फोटोशूट केले आहे.
'पतीकडून मिळालेली अमुल्य भेट'. मला इतके अमुल्य झुमके घालून फार आनंद झाला आहे', असे कॅप्शन देऊन तिने हा फोटो शेअर केला आहे.