मुंबई - चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांना अपडेट ठेवण्यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटी सोशल मीडियाचा वापर करीत असतात. सलमान खानने आगामी 'दबंग ३' चित्रपटातील 'मुन्ना बदनाम हुआ' हे गाणे शेअर केले आहे. तर शाहरुख खानने अजय देवगणला १०० चित्रपट पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरी दीक्षितच्या तेजाब चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने तिने टिक टॉक डान्स चॅलेंज दिले आहे.
आजचे ट्विट : 'तानाजी' ठरणार अजय देवगणचा १०० वा चित्रपट, सलमानच्या 'दबंग ३' चे गाणे अन् माधुरीचा डान्स - Salman Khan latest news
सलमान खानने दबंग ३ चे गाणे शेअर करुन चाहत्यांना खूश केले आहे. माधुरी दीक्षितने अनोख्या पध्दतीने तेजाब सिनेमाचे सेलेब्रिशन केलंय. अजय देवगणने १०० चित्रपट पूर्ण केल्याबद्दल शाहरुखने शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमानने 'दबंग ३' चे गाणे शेअर करीत म्हटलंय, "कमाल खानचा आवाज, बादशाहचा रॅप आणि चुलबूलची दबंगगिरी. ऐका #मुन्ना बदनाम हुआ.
माधुरीने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, " 'एक दो तीन'... माझ्यासाठी स्पेशल गाणे आहे. म्हणूनच मी टिक टॉकवर एका मजेदार डान्स चॅलेंजसह तेजाबला ३१ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करीत आहे. माझ्या स्टेप्सला मॅच करा आणि 'एक दो तीन' चॅलेन्ज पूर्ण करुन आपला व्हिडिओ शेअर करा. माझ्याकडून एक सरप्राईज मिळवा. चला नाचायला सुरूवात करा."