महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा १००० भागांचा टप्पा पूर्ण, पूजा करून झालं सेलिब्रेशन

प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने १००० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. याचं सेलिब्रेशन सेटवर पार्टी करून, केक कापून न करता एका वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं. हा आनंदाचा क्षण सेटवर पूजा करून साजरा करण्यात आला.

Tuzyat jeev Rangala serial  team
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा १००० भागांचा टप्पा पूर्ण, पूजा करून झालं सेलिब्रेशन

By

Published : Dec 3, 2019, 1:37 PM IST

मुंबई - 'झी मराठी'वरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या मालिकेने १००० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला.

प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने १००० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. याचं सेलिब्रेशन सेटवर पार्टी करून, केक कापून न करता एका वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं. हा आनंदाचा क्षण सेटवर पूजा करून साजरा करण्यात आला.

सेटवर पूजा करून साजरा केला आनंद

हेही वाचा -'डंके की चोटपर बजेगा नारा', 'तान्हाजी'चं 'शंकरा रे शंकरा' गाणं प्रदर्शित

या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी 'पाठक बाई' तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची आघाडी घेतली. यानंतर देखील प्रेक्षकांनी मालिकेला भरघोस प्रतिसाद दिला.

'तुझ्यात जीव रंगला'ची टीम

याबद्दल बोलताना 'पाठकबाई' म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली, 'प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने १००० भाग पूर्ण केले. यामध्ये या वास्तूचा देखील खूप मोठा हात आहे. या वास्तूने आम्हाला साडेतीन वर्ष साथ दिली. त्यामुळे या वास्तूचे आभार मानून नवीन भागाची सुरुवात करण्यासाठी आम्ही पूजेचा घाट घातला. रसिक प्रेक्षकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमासाठी आणि त्यांनी इथवर दिलेल्या साथीसाठी मी त्यांचे आभार मानते."

राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "दरवेळी केक कापून किंवा पार्टी करून हा आनंद साजरा करण्यात येतो. पण यावेळी आमच्या संपूर्ण टीमने असा निर्णय घेतला कि जिथे आपण शूट करतो तिथे सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी आपण एक छानशी पूजा आणि होम करून हा आनंद साजरा करूया. म्हणून ही पूजा आम्ही सेटवर केली. १००० भाग पूर्ण केल्याचं सगळं श्रेय आमच्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना मी देतो', असेही तो म्हणाला.

हेही वाचा -मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट

ABOUT THE AUTHOR

...view details