महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तुला शोधते रे’ : गुगलवरदेखील चाहत्यांकडून राजनंदिनीचा शोध - Shilpa Tulaskar

‘तुला पाहते रे’मधील राजनंदिनीची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही, तर गुगल ट्रेण्ड्समध्येही नेटिझन्सनी राजनंदिनीचं नाव सर्वात जास्त सर्च केलं आहे.

राजनंदिनी

By

Published : May 3, 2019, 4:43 PM IST


झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. या मालिकेच्या कथेमध्ये मोठा ट्विस्ट आला असून. नुकतीच राजनंदिनी या भूमिकेची मालिकेत एण्ट्री झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारणार असून सोशल मीडियावरही ‘तुला पाहते रे’मधील राजनंदिनीची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही नेटिझन्सनी राजनंदिनीचं नाव सर्वात जास्त सर्च केलं आहे. यावरून राजनंदिनीच्या एन्ट्रीची उत्सुकता आणि मालिकेची लोकप्रियता याचा अंदाज आपण लावू शकतो.

ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही, तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही लोकप्रिय आहे. मालिकेच्या टीझरमध्ये राजनंदिनीची झलक पाहायला मिळाली होती. पण आतापर्यंत मालिकेत तिची एण्ट्री झाली नव्हती. मालिकेत तिच्या येण्याने आणखीनच लोकप्रियता वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details