अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आयुष्यमान खुराणा याचा अलिकडे रिलीज झालेल्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कार्यकर्ते पीटर टेक्टेल यांनी सोशल मीडियामध्ये चित्रपटाबद्दल पोस्ट लिहिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
वाह!! डोनाल्ड ट्रम्पनी केले 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चे कौतुक
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाचे कौतुक केले आहे. मानव अधिकार कार्यकर्ते पीटर टेक्टेल यांनी सोशल मीडियामध्ये चित्रपटाबद्दल पोस्ट लिहिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, होमोसेक्सुएलिटी हा गुन्हा नाही हे घोषीत झाल्यानंतर एक नवीन बॉलिवूड रॉम कॉममध्ये गे रोमान्स दाखवण्यात आलाय ज्याला लोक पसंत करीत आहेत.
ट्रम्प यांच्या या ट्विटला १२.५ हजार लोकांनी पसंत केलंय. आयुष्यमान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. होमोसेक्सुएल सारख्या विषयावर विनोदी पध्दतीने भाष्य करण्याची रिस्क आयुष्यमानने घेतली याचे कौतुक प्रेक्षकांनी केलंय. आयुष्यमानला साथ देणाऱ्या जितेंद्रच्या कामाचेही लोकांनी कौतुक केलंय.