हैदराबाद - नागा चैतन्य आणि सई पल्लवीच्या 'लव्ह स्टोरी'चा थिएटर ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. दोघांच्याही चाहत्यांनी याचे प्रचंड स्वागत केले आहे. शेखर कम्मुला दिग्दर्शित या चित्रपटाची कथा कलेच्या ध्यासाने एकत्र आलेल्या दोघांची आहे. ट्रेलरमधील साई पल्लवीच्या डान्स मुव्हज प्रेक्षणीय दिसल्या आहेत.
चैतन्यने सोमवारी ट्रेलर रिलीज झाल्याची घोषणा आपल्या ट्विटरवर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''अखेरीस ट्रेलर बाहेर पडल्यावर खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये भेटण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही. 'लव्ह स्टोरी' 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.''