देशभक्तीच्या भावनेने भरलेला अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज झाला होता. सत्य कथेवर आधारित या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार या ट्रेलरमध्ये दिसतो. सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे.
या चित्रपटात विजय कर्णिकच्या भूमिकेत अजय देवगण दिसला आहे. तर नोरा फतेहीही या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. गुजराती वेशभूषेत सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा लूकही प्रभावशाली वाटत आहे. शरद केळकरही एका साहसी सैनिकाचे पात्र साकारत आहे.
डायलॉग्स
ट्रेलरमध्ये अनेक देशभक्तीने ओथंबलेले संवाद पाहायला मिळतात. यातील लक्ष वेधणारे काही डायॉग्ज पुढील प्रमाणे -
''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना''
''किसी की जान बचाने के लिए की गई हिंसा धर्म है, ताजमहल प्यार की निशानी है तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है''
''या खुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरे हिंदुस्तान को सलामत रखना''.
काय आहे चित्रपटाची कथा?
'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे 'भूज द प्राईड ऑफ इंडिया'. अभिषेक दुधाइया 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी भुज विमानतळाचा प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्याभोवती फिरत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत भुजच्या निर्मात्यांनी सांगितले होते की हा चित्रपट आज 13 ऑगस्ट रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित झालाय. अजय देवगणशिवाय संजय दत्त, सोनाक्षी, नोरा आणि अॅमी यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्याशिवाय शरद केळकर, प्रणीता सुभाष, इहाना ढिल्लनसुद्धा स्क्रीन शेअर करताना दिसतील.
हेही वाचा - राजकारणात येण्यापूर्वीच रजनीकांत यांचा "राजकारण संन्यास"