मराठी चित्रपट आशयघनतेसाठी प्रसिद्ध आहे. याच वैशिष्ट्याच्या बळावर जगभर कौतुकास पात्र ठरणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मनोरंजनाच्या माध्यमातूनही काही ना काही संदेश देणारं आशयघन कथानक ही नेहमीच मराठी सिनेमांची खासियत राहिली आहे. त्याच अनुषंगाने सद्य सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'आश्रय' या आगामी मराठी सिनेमातही एक आशयसंपन्न कथानक पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत 'आश्रय'ची निर्मिती अभिषेक संजय फडे यांनी केली आहे तर दिग्दर्शन रमेश पोपट ननावरे आणि संतोष साहेबराव कापसे यांनी केलं आहे. 'आश्रय'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं चित्रपटाच्या कथानकाचं प्रतिनिधीत्व करणारा आहे. चित्रपटाचा मूळ विषयाचं गुपित कुठेही न उलगडता बनवण्यात आलेल्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत आहे. या ट्रेलरमध्ये आई नावाच्या दैवी शक्तीबाबत सांगण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या स्वप्नांची सांगड वास्तवाशी घालण्यात आल्याचं पहायला मिळतं. या जोडीला स्वप्नांच्या मागं धावत ती साकार करण्यासाठी आणि स्वत:ची ओळख तयार करण्यासाठी धडपडणाऱ्या नायक-नायिकेची रोमँटिक कथाही आहे.
'आश्रय' हा केवळ एक चित्रपट नसून, तो एक विचार आहे - दिग्दर्शक - Ashray directed by Ramesh Popat Nanavar
सद्य सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'आश्रय' या आगामी मराठी सिनेमातही एक आशयसंपन्न कथानक पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
आश्रय चित्रपटाचा ट्रेलर रिलीज