महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बजेट 'येरे येरे पैसा 2'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. अनेक टाळीबाज आणि पोट धरून हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग यात पाहायला मिळतात.

'येरे येरे पैसा 2'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jul 29, 2019, 12:59 PM IST

मुंबई- लंडनमध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद... हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या "ये रे ये रे पैसा २" या मराठी चित्रपटाचं आहे.

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणारे अण्णा अन् त्यांचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट "ये रे ये रे पैसा २" मध्ये पाहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. अनेक टाळीबाज आणि पोट धरून हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग यात पाहायला मिळतात.

या चित्रपटात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, फैजल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनील नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा तर राहुल-संजीव यांनी या सिनेमाचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गायक अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details