मुंबई -अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हाऊसफुल ४' चित्रपटाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा आहे. अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे हटके लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच, या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
'हाऊसफुल', 'हाऊसफुल २' आणि 'हाऊसफुल ३' या तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. कॉमेडीचा तडका आणि आपल्या कॉमिक टायमिंगने या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. 'हाऊसफुल ४' या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत.
हेही वाचा-'धकधक गर्ल'सोबत 'देसी गर्ल'चा धमाल 'पिंगा', पाहा व्हिडिओ