संदिप मोहितेपाटील यांची प्रस्तुती असलेला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट "सरसेनापती हंबीरराव"चा टीजर अलिकडेच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला. प्रविण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आता यात भर पडली आहे टॉलिवूड आणि बॉलीवूडमधल्या "सुपरस्टार्स"ची आणि त्यांनीसुद्धा हा टीजर पाहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
डार्लिंग स्टार म्हणून ओळख असणाऱ्या आणि बाहुबली चित्रपटाद्वारे जगभर आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुपरस्टार प्रभासने "सरसेनापती हंबीरराव" चित्रपटाचा टीजर पाहिला आणि सोशल मिडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. "मला टीजर खूप आवडला! मराठीतील आत्तापर्यंतच्या सर्वात भव्य अशा ऐतिहासिक चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा. "