मुंबई -महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत एक खास सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनीही हजेरी लावली होती. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बॉलिवूड कलाकारांनी मोदींची भेट घेतली.
शाहरुख खान, कंगना रनौत, आमिर खान, जॅकलिन फर्नांडिस, बोनी कपूर, एकता कपूर, राजकुमार हिरानी आणि इतर बरेच बॉलिवूड कलाकार मंडळी यावेळी उपस्थित होते.
या खास कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांनी महात्मा गांधींचे विचार मांडत एक खास व्हिडीओ देखील शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा -फेमिना मिस इंडिया २०१८ ची विजेती अनुकृती वास म्हणाली... "वन नेशन वन अॅप' ईज बेस्ट"
या व्हिडिओमध्ये आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, कंगना रनौत, आलिया भट्ट, सोनम कपूर, विकी कौशल यांच्या आवाजात गांधीजींचे विचार ऐकायला मिळतात. राजकुमार हिरानी यांनी या व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तसेच या कलाकार मंडळींचे कौतुक केले आहे. बॉलिवूड कलाकार आणि त्यांचा उत्साह हा नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशाला वाखाणले जाते. या इंडस्ट्रीमधील सिनेमा, गाण्यांनी लोकांना जोडले जाते, म्हणूनच त्यांच्या मदतीने गांधींचे विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा आशयाचे ट्विट मोदी यांनी केले आहे.
हेही वाचा -'येरे येरे पावसा' चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच
'पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट छान झाली. त्यांचे विचार ऐकून खूप छान वाटलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायक आहे', असे आमिर खान म्हणाला. तर, कंगनानेही तिचे विचार व्यक्त केले.