मुंबई- मराठमोळा अभिनेता आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा स्वप्नील जोशी लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मोगरा फुलला' चित्रपटात तो झळकणार असून गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे पोस्टर आणि त्यातील नवीन गाणी प्रदर्शित होण्यास सुरूवात झाली आहे.
शंकर महादेवन यांच्या आवाजातील 'मोगरा फुलला'चं शीर्षक गीत प्रदर्शित - marathi movie
'मोगरा फुलला' हे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात स्वप्नीलचे आपल्या आईसोबत असलेले मैत्रीपूर्णसंबंध. वयात आलेल्या मुलाच्या लग्नासाठी घरच्यांची चाललेली घालमेल आणि स्वप्नीलच्या आयुष्यात आलेली मुलगी असा प्रवास पाहायला मिळतो.
अशात आता नुकतंच चित्रपटाचं 'मोगरा फुलला' हे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात स्वप्नीलचे आपल्या आईसोबत असलेले मैत्रीपूर्णसंबंध. वयात आलेल्या मुलाच्या लग्नासाठी घरच्यांची चाललेली घालमेल आणि स्वप्नीलच्या आयुष्यात आलेली मुलगी असा प्रवास पाहायला मिळतो.
या गाण्याला प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी आवाज दिला आहे. तर रोहित शाम राऊत यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. श्रावणी देवधर यांच्या या सिनेमातून कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचे वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. येत्या १४ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.