महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जस्टीन टिंबरलेकच्या आयुष्यात नवे वादळ, पत्नीसह कुटुंबीयांची मागितली जाहीर माफी - Timberlake renders public apology to wife for getting cozy with co-star

जस्टीन टिंबरलेकने आपली पत्नी आणि कुटुंबीयांची माफी मागितली आहे. त्याचा सहअभिनेत्रीसोबतचा वादग्रस्त फोटो व्हायरल झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले होते.

Timberlake renders public apology to wife
जस्टिन टिंबरलेकने पत्नी आणि कुटुंबियांची मागितली माफी

By

Published : Dec 6, 2019, 5:54 PM IST

लॉस एंजेलिस - गायक अभिनेता जस्टिन टिंबरलेक याने पत्नी जेसिका बेल हिची माफी मागत माफीनामा प्रसिध्द केला आहे. सहकलाकार अलिशा वेनराईट हिच्या गळ्यात गळा घालून काढलेला फोटो व्हायरल झाल्याबद्दल जस्टिन टिंबरलेकने माफी मागितली आहे.

गेल्या आठवड्यात गायक अभिनेता जस्टिन टिंबरलेक याचा पॅमरमधील सहकलाकार वेनराईटसोबतचा फ्लर्ट करीत असलेला फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची त्याच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चा होती.

मीडिया रिपोर्टनुसार जस्टिन टिंबरलेक आणि वेनराईट शूटींगच्या दरम्यान रात्री न्यू ऑर्लेस बारमध्ये दंगामस्ती करीत होते. त्यावेळचा हा फोटो होता. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री वेनराईट हिने आपला हात जस्टिन टिंबरलेकच्या गुढग्यावर ठेवला असून दोघे एकमेकांच्या हाताला स्पर्श करीत आहेत.

जस्टिन टिंबरलेक याने गुरुवारी आपल्या इन्स्टाग्रामवर एक मोठे निवेदन प्रसिध्द करून पत्नीची माफी मागितली आहे. जस्टिन टिंबरलेकने माफीनाम्यात लिहिलंय, "शक्य तितका मी गॉसिप्सपासून लांब राहतो. परंतु, माझ्या कुटुंबीयांना वाटते की, अलिकडे जे घडले त्याबद्दल मी व्यक्त व्हावे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी दुखवू शकत नाही. काही आठवड्यापूर्वी माझ्याबद्दल काही गोष्टींच्या अफवा पसरल्या. मला त्या स्पष्ट करू द्या, मी आणि माझ्या सहकलाकारामध्ये काहीच घडले नाही."

"त्या रात्री थोडी जास्त प्यायली होती, याबद्दल मला लज्जा वाटते. मला नीट राहायला पाहिजे होते. हे उदाहरण मी माझ्या मुलासाठी सोडू शकत नाही. मी पत्नी आणि कुटुंबीयांची माफी मागतो. माझ्यामुळे त्यांना वाईट स्थितीतून जावे लागले. मी अधिक चांगला पती आणि बाप बनण्याचा प्रयत्न करेन. मला पॅमरमध्ये काम केल्याचा अभिमान आहे. मी पुढेही काम करेन आणि लोकांनी हे पाहावे यासाठी मी उत्सुक आहे," असे जस्टिन टिंबरलेकने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details