मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते तिग्मांशु धुलिया हे सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक असल्याचे मत अभिनेता दीपराज राणा यांनी व्यक्त केलंय. दोघांनी 'साहब, बीबी और गैंगस्टर' आणि 'बुलेट राजा' यासारख्या चित्रपटातून एकत्र काम केले होते.
धुलियांसोबत कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना दीपराज म्हणाला, "मी त्यांच्यासोबत सुमारे अर्धा डझन चित्रपटातून एकत्र काम केले आहे. ते आपल्या चित्रपट उद्योगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक आहेत."