मुंबई - 'बागी' आणि 'बागी २'च्या यशानंतर टायगर श्रॉफ पुन्हा एकदा 'बागी ३' मध्ये अॅक्शन अवतारात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा अधिक अॅक्शन पाहायला मिळते.
टायगर श्रॉफसोबत अभिनेता रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही यामध्ये भूमिका आहे. रितेश हा टायगरचा भाऊ 'विक्रम'च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, टायगरने 'रॉनी'ची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा -'बॉब विश्वास'च्या सेटवर अभिषेकला मिळाले खास सरप्राईझ, पाहा फोटो
'विक्रम' आणि 'रॉनी' या दोन्ही भावाचा खास बॉन्ड दाखवण्यात आला आहे. विक्रम कोणत्याही कठीण परिस्थितीत अडकला, तर 'रॉनी' त्याला त्यामधून सोडवत असतो. पुढे काही कामानिमित्त विक्रम सिरियाला जातो. तिथे काही लोक त्याचे अपहरण करतात. त्याला सोडवण्यासाठी 'रॉनी' गुंडांशी कसा लढतो? 'रॉनी' त्याच्या भावाला वाचवू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळतील.
हेही वाचा -अरमान जैनच्या लग्नात शाहरुख-गौरीचा 'कजरा रे' डान्स, व्हिडिओ व्हायरल
३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफचा दमदार लुक पाहयला मिळतो. या चित्रपटासाठी त्याने आपल्या शरीरावर विशेष मेहनत घेतली आहे.
दिग्दर्शक अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, साजिद नादियाडवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ६ मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल.