मुंबई -अभिनेता टायगर श्रॉफच्या 'बागी ३' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात टायगरसोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर टीमच्या संपूर्ण कलाकारासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
टायगरसोबत 'बागी'च्या पहिल्या भागामध्येदेखील श्रद्धा कपूर झळकली होती. तर, दुसऱ्या भागात दिशा पटाणीने भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या भागात पुन्हा एकदा श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे.
हेही वाचा -प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच 'ड्रीमगर्ल'ची धमाल पार्टी, पाहा गाणं
या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान हे करत आहेत. तर, फरहाद समजी यांनी कथा लिहिली आहे. साजिद नादियाडवाला हा निर्मिती करत आहे. तर, फॉक्स स्टार स्टुडिओझ सहाय्यक निर्माता आहे.
टायगर लवकरच हृतिक रोशनसोबत 'वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, श्रद्धाचे 'साहो' आणि 'छिछोरे' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता टायगर आणि श्रद्धाची जोडी पुन्हा एकदा 'बागी ३'मध्ये पाहायला मिळेल. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -सोनमच्या 'झोया फॅक्टर'साठी 'मास्टर ब्लास्टर'च्या शुभेच्छा, ट्विट व्हायरल