मुंबई - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या वेगवेगळ्या स्टंटसाठी ओळखला जातो. म्हणूनच त्याची ओळख अॅक्शन हिरो म्हणून तयार झाली आहे. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. आपल्या वर्कआऊटचे फोटो तसेच व्हिडिओ तो चाहत्यांशी शेअर करत असतो. त्याचे काही स्टंटदेखील लोकप्रिय आहे. अलिकडेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्येही त्याचा थक्क करणारा स्टंट पाहायला मिळतो. टायगरने त्याच्या चाहत्यांनाही हा स्टंट करुन दाखवण्याचे चॅलेंज दिलं आहे.
टायगरने त्याचा आवडता स्टंट या व्हिडिओमध्ये साकारला आहे. चाहत्यांना त्याने चॅलेंज देत व्हिडिओ देखील शेअर करायला सांगितला आहे.