मुंबई -अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघांच्याही नात्याच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा पाहायला मिळतात. जाहिरातींमध्येही दोघांनी एकत्र काम केले आहे. मात्र, टायगरला दिशा नव्हे तर त्याची दुसरी सहकलाकार आवडत असल्याचा खुलासा त्यानेच केला आहे.
होय, टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना याचा खुलासा केला आहे. खरंतर अलिकडेच टायगरने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' हे सत्र सुरू केलं होतं. यावर त्याला चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारले. त्याच्यासोबत 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने बॉलिवूड पदार्पण केले आहे. त्यामुळे अनन्याने टायगरला तुला कोणती सहकलाकार आवडते हा प्रश्न विचारला. याचे मजेशीर उत्तर देताना टायगरने मला ('Woh') आवडत असल्याचे सांगितले आहे.