मुंबई - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयासोबतच डान्ससाठी लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलिकडेच त्याचा म्युझिक व्हिडिओ लॉन्च करण्यात आला आहे. या व्हिडिओची सध्या प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
पार्टी थिमवर आधारित '8 pm' या गाण्यावर टायगरचा धमाल डान्स पाहायला मिळतो. या गाण्याची कोरिओग्राफी रेमो डिसुजाने केली आहे. बेनी दयालने हे गाणं गायलं आहे. सचिन- जिगर या जोडगोळीने या गाण्याला कंपोझ केले आहे.