मुंबई: भारतात सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता संपूर्ण जगाच्या डोळ्यासमोर आले आहे. कृषी कायद्याचा निषेध करणार्या शेतकर्यांच्या या आंदोलनाला आता 60 दिवसांहून अधिक काळ झाला आहे. यादरम्यान आता जगभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच अमेरिकन पॉप स्टार रिहाना हिने आपल्या ट्विटर हँडलद्वारे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. रिहानाने ट्विटमध्ये म्हटलंय की, "आम्ही शेतकर्यांबद्दल का बोलत नाही. # फार्मर्सप्रोटेस्ट." रिहानाच्या ट्विटवर बॉलिवूड सेलेब्सच्या प्रतिक्रिया सतत येत आहेत.
अभिनेत्री स्वरा भास्करने रिहानाच्या ट्विटला पाठिंबा दर्शविला. त्याचवेळी रिहानाच्या ट्विटला कंगना रणौत हिने प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटमध्ये लिहिलं की की, "कोणी त्यांच्याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत. हे दहशतवादी आहेत, जे भारत तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरुन चीन आपल्या दुर्बल तुटलेल्या देशाचा ताबा घेईल, चिनीसारखी वसाहत बनवू शकले. "