वेद आणि विज्ञान यांच्यातील दुआ दर्शविणाऱ्या ‘ कानभट्ट’चा ट्रेलर प्रदर्शित - Kanbhatt film trailer
आतापर्यंत यशस्वी झालेल्या अनेक मराठी चित्रपटांच्या आशयानेच त्या-त्या चित्रपटात एकप्रकारे नायकाची भूमिका साकारली आहे. असाच एक नवीन आशयसंपन्न मराठी चित्रपट ‘कानभट्ट’ रिलीजसाठी सज्ज आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्या अपर्णा एस होशिंग आणि अभिनेता भव्य शिंदे “कानभट्ट” द्वारे प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट देण्यास उत्सुक आहेत. हा पीरियड ड्रामा १९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

मुंबई - मराठी सिनेमा त्याच्या आशयघनतेमुळे भारतात व परदेशातही मान मिळवत आहे. मराठीतील उत्कृष्ट कलाकृती पाहून चक्क बॉलिवूडमधील अनेक मोठी नावे मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरली आहेत. उत्तम संहिता हे प्रगल्भ मराठी सिनेमाचे द्योतक आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं कथानक, हेच मराठी चित्रपटाच्या यशाचे गमक आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे.
आतापर्यंत यशस्वी झालेल्या अनेक चित्रपटांच्या आशयानेच, त्या-त्या चित्रपटात एकप्रकारे नायकाची भूमिका साकारली आहे. असाच एक नवीन आशयसंपन्न मराठी चित्रपट ‘कानभट्ट’ रिलीजसाठी सज्ज आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्या अपर्णा एस होशिंग आणि अभिनेता भव्य शिंदे “कानभट्ट” द्वारे प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेट देण्यास उत्सुक आहेत. हा पीरियड ड्रामा १९ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पडद्यावर येईल.