महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जोकर सिनेमानं रचला इतिहास, ट्रेलरला आठ मिनिटे मिळाली स्टँडिंग ओव्हेशन - जोकिन फोयनिक्स

जोकर या हॉलिवूड चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटाचे स्क्रिनिंग व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये नुकतेच पार पडले. जे या चित्रपटाला प्रेक्षकांनी सलग ८ मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन दिली.

जोकर सिनेमानं रचला इतिहास

By

Published : Sep 4, 2019, 7:33 PM IST

मुंबई - जोकर या हॉलिवूड चित्रपटाने इतिहास रचला आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा प्रत्येकाने श्वास रोखून तो पाहिला. जोकिन फोयनिक्स या अभिनेत्याने साकारलेला जोकर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. या चित्रपटाचे स्क्रिनिंग व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये नुकतेच पार पडले. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांनी सलग ८ मिनीटे स्टँडिंग ओव्हेशन दिली.

हेही वाचा - साहो : 'नक्कल करायलाही अक्कल लागते'... फ्रेंच दिग्दर्शक जेरोम साल्ले यांचा टोमणा

हा इव्हेन्ट पाहून अभिनेता जोकिन फोयनिक्स भारावून गेला होता. सिनेमाच्या इतिहासातील असा जोकर व्हिलन खळबळ उडवून देणारा होता. जगभरातील प्रत्येक समिक्षकांनी जोकर पाहून आपल्या उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोकर चित्रपट हा असा चित्रपट आहे, की ज्यामुळे कलाकारांची कारकिर्द, भूमिका, व्यक्तीरेखा यांना कलाटणी मिळू शकते.

व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलला मिळालेल्या प्रतिसादानंतर, विशेषतः ८ मिनिटांच्या स्टँडिंग ऑडिशननंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे.

हेही वाचा -पुतळ्यातली आई पाहून श्रीदेवीच्या मुली झाल्या भावूक

ABOUT THE AUTHOR

...view details