महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ताश्कंद फाईल्स'मध्ये उलगडणार लाल बहादूर शास्त्रींचा जीवनपट, 'हे' कलाकार साकारणार मुख्य भूमिका! - shweta basu

'लाल बहादूर शास्त्री' यांच्या गूढ मृत्यूचे रहस्य 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटातून उघड होणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

'ताश्कंद फाईल्स'मध्ये उलगडणार लाल बहादूर शास्त्रींचा जीवनपट

By

Published : Mar 22, 2019, 11:08 PM IST

मुंबई - भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित 'ताश्कंद फाईल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार आहेत, यावरून पडदा उठविण्यात आला आहे. सोशल मीडियावर या कलाकारांचे लूक्स शेअर करण्यात आले आहेत.


'लाल बहादूर शास्त्री' यांच्या गूढ मृत्यूचे रहस्य 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटातून उघड होणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटामध्ये लाल बहादूर शास्त्री यांची भूमिका मिथून चक्रवर्ती साकारणार आहेत. त्यांच्या सोबत नसरूद्दीन शहा, श्वेता बसू प्रसार, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी आणि अंकुर राठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.


चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या कलाकारांचे लूक्स सोशल मीडियावर शेअर कले आहेत.
२५ मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details